पाडळसे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मंथन स्पर्धेत उज्वल यश
पाडळसे. ता.यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘मंथन स्पर्धा परीक्षा’त उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण शाळेचे नाव उज्वल केले आहे. शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये इयत्ता तिसरीतील तोशल गजानन इंगळे याने प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विशेष यशाबद्दल शाळेच्या शिक्षिका श्रीमती ज्योती सनेर यांनी त्याला ५०० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविले.
त्याचप्रमाणे विजय ज्ञानेश्वर तायडे (इयत्ता चौथी), रुद्र खेमचंद कोळी, ध्रुव पाटील, तेजस्विनी तायडे, पांडुरंग कोळी, सात्विक नेहेते, अभिषेक तायडे आदी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर यशामध्ये श्रीमती ज्योती सनेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याबद्दल पालकांनी त्यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून चावडी वाचनाचे सत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे प्रभावीपणे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. खेमचंद कोळी होते.
या कार्यक्रमाला पोलीस पाटील श्री. सुरेश खैरनार, मुख्याध्यापिका श्रीमती वंदना पाटील, ज्योती पाटील, सीमा जावळे, जितेंद्र फिरके, सुनील पाटील, मंगेश पाटील, गणेश कोळी, कांचन फेगडे आदी शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती ज्योती सनेर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. खेमचंद कोळी यांनी मानले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा