तरुणांची गळपास घेऊन आत्महत्या !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेंदालाल मिल परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेला शहरातील एका कंपनीत नोकरीस असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. कौटुंबिक कारणावरुन विजय महाजन वय-३० यांनी गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफार घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शेजाऱ्यांंच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर तात्काळ कुटुंबियांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने विजय याला खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.