पाल येथील आत्महत्या प्रकरण : अंगलट न येण्यासाठी सुकी नदीपात्रात टाकला मृतदेह, सात जणांवर गुन्हा दाखल
रावेर. मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | रावेर तालुक्यातील पाल येथे वन प्रेक्षण केंद्राखाली सुकी नदी पात्रात वनपरिक्षेत्र हद्दीतील नदीपात्रात दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सुरेश सुमा रिया बारेला. वय २५ वर्ष. याचा दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदस्यास्पद मृतदेह आढळला होता. घातपाताची शक्यता असल्याच्या दृष्टिकोनातून पोलिस तपास करीत होते. मात्र हा घातपात नसून आत्महत्या असल्याचे समोर आले. मात्र संशयितांच्या घराजवळ हा प्रकार घडल्याने सदर प्रकारचा आपल्या अंगाशी येईल या भीतीने सुरेश बारेला यांचा मृतदेह सुकी नदीच्या पात्रात टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मृतदेह हलविल्या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत सुरेश बारेला हा कलोरी तालुका जिल्हा खंडवा मध्य प्रदेश येथील मूळ रहिवाशी हल्ली मुक्काम दापोरे पोस्ट रवंजा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून हा पत्नी चंपाबाई सह मुलाबाळांना घेऊन पाल येथील पिंपरकुंड पाड्यावर सासुरवाडीत मंगळवारी आलेला होता. त्याची बहीण पाल येथील बैल पडावा येथे पार्वतीबाई जाड्या बारेला हीस भेटण्यासाठी थांबणार होता. परंतु त्याचा मृतदेह बुधवारी वन हद्दीतील सुकी नदी पात्रात संशयास्पद मयत स्थितीत मिळून आला होता. त्याचा मृत्यू घातपातातून तर झाला नव्हे ,असा संशय व्यक्त केला जात होता .
फैजपूर विभागाचे प्रभारी पोलिस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तपासाची चक्रे फिरवत तपासाला वेग देत छडा लावला. मयताच्या मानेवरील व्रण पाहता बारेला याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र आपल्या घराजवळ आत्महत्या केलेला इसम गावातील जावई आल्याने आपल्यावर घातपाताचा संशय नको, नाहक आपल्या अंगलट येईल या भीतीने पाल येथील काही जणांनी सुरेश बारेला याचा मृतदेह सुकीनदी पत्रातील पाल च्या कच्च्या रस्त्यावर आणून टाकला. त्या नुसार वनपरिक्षेत्र हद्दीतील नदीपात्रात दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सुरेश सुमा रिया बारेला. वय २५ वर्ष. याचा दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला.
मृतदेह हलविल्या प्रकरणी मयत सुरेश बारेला याची पत्नी चंपाबाई बारेला हिने दिलेल्या फिर्यादी वरून रावेर पोलिस स्टेशनला गिरसिंग कर्ता बारेला, तेजसिंग कर्म्या बारेला, सीताराम कजम्या बारेला, रेजला गोटा बारेला, धीचल सीताराम बारेला, व बारसिंग नावडा बारेला या सात जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.