Maharashtra Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट!
Monday To Monday News Network :
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या Maharashtra Elections राजकारणात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल पावसाळ्यानंतर वाजू शकतं. पण असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. याबाबत उद्या होणारी सुनावणी टळली आहे. राज्य सरकारने पंधरा दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता मनपा, जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आता निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागलं आहे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुनावणीसाठी राज्य सरकारकडून 15 दिवसांचा वेळ मागितला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या निवडणुका आरक्षणाशिवाय घेऊ नये, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विरोधक आणि सत्ताधारी पक्षांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुनावणी सुरु आहे. दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल करण्यात आले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे सरकारने वॉर्ड रचनेत आहे तशीच परिस्थिती ठेवण्याचा निर्णय ठेवला होता.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आलं. एक वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोना काळात रखडल्या होत्या. त्यामुळे अशा महानगरपालिकांवर प्रशासनाकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे या निवडणुका रखडल्या. त्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.