भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराष्ट्रीय

मोठी बातमी : अयोध्येला निघालेल्या “आस्था” ट्रेनवर दगडफेक

सुरत, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। गुजरातच्या सूरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं. रविवारी या ट्रेनवर जोरदार दगडफेक झाली. सूरतहून रात्री आठच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती. ट्रेन नंदूरबार येथे पोहोचताच रात्री १०.४५ च्या सुमारास अचानक दगडफेक सुरु झाली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. त्यांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. पण अनेक दगड ट्रेनमध्ये येऊन पडले. या दगडफेकीत कोणी जखमी झाल्याची माहिती नाहीय.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफने सुरुवातीच्या तपासानंतर ट्रेनला रवाना केलं. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री ८ वाजता निघाली होती. एकूण १३४० प्रवासी या ट्रेनमध्ये होते. ट्रेनमधील प्रवाशी जेवल्यानंतर भजन करत झोपणार होते. पावणेअकराच्या सुमारास ट्रेन नंदूरबार येथे पोहोचली. इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरु झाली.

दगड ट्रेनच्या आत आले
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाजूंनी दगड येत होते. एक नाही, तर अनेकजण दगडफेक करत असल्याचा संशय आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले. त्यांनी लगेच दरवाजे, खिडक्या बंद केल्या. मात्र, तरीही अनेक दगड ट्रेनच्या आत येऊन पडले होते.


सहा फेब्रुवारीला गुजरातहून पहिली आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येला रवाना झाली होती. या ट्रेनला मेहसाणा रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी सांगण्यात आलं होतं की, लवकर आणखी काही ट्रेन गुजरातच्या अन्य रेल्वे स्थानकातून सोडल्या जातील. याचाच भाग म्हणजे रविवारी सूरतहून आस्था स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!