सुरेश खैरनार आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित
पाडळसे,ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तुत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये पाडळसे तालुका यावल येथील पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांनी करोना काळात केलेले प्रभावी काम पोलीस विभागाला केलेले सहकार्य .महसूल विभागास असलेल्या सहकार्य तसेच आपली कर्तव्य जबाबदारीने पार पाडल्याचे दखल घेऊन त्यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निवेदिता माने उद्योजक श्री एन सी संघवी सनदी लेखापाल डॉक्टर शंकर अदानी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण काकडे डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर हात कंगणेचे तहसीलदार सुशील बेलकर काकासाहेब देशमुख सौ संगीता शिंदे डॉक्टर सायली पवार डॉक्टर चंद्रकांत बाबर आधी उपस्थित होते स्वागत व प्रस्ताविक ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे