आरोग्यरावेर

सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये होणार थ्रीडी 4 k जर्मन टेक्नॉलॉजी लॅप्रोस्कोपी ने शस्त्रक्रिया

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये थ्रीडी 4 k जर्मन टेक्नॉलॉजी ची अत्यंत प्रगत अशी लॅप्रोस्कोपी मशिन परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर, जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी उपलब्ध झालेली असून ही थ्रीडी लॅप्रोस्कोपी कार्ल स्टोर्झ या जर्मन कंपनीने बनवली आहे. ही मशीन महागडी असून भारतात फक्त ठराविक मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत.या मशीनच्या साह्याने पोटाच्या शस्त्रक्रिया काटेकोरपणे अचूक करण्यात मदत होते.उदा. गर्भाशय अंडाशय गर्भनलिका याच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. आतड्यांच्या संदर्भातील अपेंडिक्स पित्ताशय इत्यादी. शस्त्रक्रिया.ही उपचार सुविधा मोठ्या शहरातील खर्चाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाजवी दरामध्ये करून दिल्या जाणार आहेत अशी माहिती सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ.व्ही.जे. वारके डॉ.सुनीता वारके, डॉ.प्रशांत भारंबे व तज्ञ इंजिनिअर श्री. अमर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमी वेळेत प्रभावी उपचार
या अत्याधुनिक उपकरणांमुळे डॉक्टरांना उपचार प्रक्रियेसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. लॅप्रोस्कोपी सर्जिकल प्रक्रिया, नैदानिक तपासणी आणि मेडिकल इमेजिंग अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित होणार आहे. यामुळे रुग्णांना जलद बरे होण्यास मदत होईल.

सुश्रुत हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे सावदा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सावदा परिसरातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच प्रगत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून, ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांच्या दर्जात मोठी सुधारणा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!