भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जिल्ह्यात चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात “सर्जिकल स्ट्राइक” वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावासह परिसरात सुरू असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने भल्या पहाटे पाच वाजेपासून धाड टाकून मोठी कारवाई करत ‘सर्जिकल स्ट्राइक’ केली. या कारवाईत साधारण ५० ते ६० ट्रॅक्टर व डंपर जप्त करण्यात आले.

पहाटे सकाळी पाच वाजता धरणगाव व जळगाव शहरातील
सुमारे दीडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बांभोरी येथे दाखल झाला. या मोहिमेत सहभागी झालेल्या
सुमारे दिडशे च्या फौजफाट्याने सुमारे ५० ते ६० ट्रॅक्टर व डंपर जप्त केले. जप्त करण्यात आलेली वाहने पोलीस मुख्यालयात आणण्यात आली आहेत. विना नंबर तसेच मुदत संपलेल्या वाहनांवर आरटीओमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटेच झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवस अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!