भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कारागृहामध्ये कैद्याच्या हत्ये प्रकरणी कारागृह रक्षकाचे निलंबन

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l येथील जिल्हा कारागृहामध्ये भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा रिपाई चे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रविंद्र खरात यांचे खून प्रकरणी कारागृहात बंदी असलेल्या आरोपीची कारागृहातच हत्या करण्यात आली. त्या हत्ये प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी एका कारागृह रक्षकाला संध्याकाळी निलंबित केले.या कारागृहातील हत्ये संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील पथक देखील चौकशीसाठी आहे. डॉ. सुपेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

कारागृहामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी मोहसीन असगर खान (वय २५ रा. भुसावळ) याचा धारदार शास्त्राने कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ येथे संशयित आरोपी शेखर मोघे यांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.तर शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान गुरुवारी दि. ११ जुलै रोजी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आज गुरुवारी कारागृहाची पाहणी केली. खून झाला ते घटनास्थळ पाहिले. सोबतचे बंदी व कारागृह अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी केली. कारागृहाचे रेकॉर्ड तपासले. त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा आढळल्याने कारागृह रक्षक गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे डॉ. सुपेकर यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पीएसआय देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!