जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे बनावट प्रोफाईल द्वारे अधिकारी, कर्मचारी याना संशयास्पद मेसेज
जळगांव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती ९४७८२५६००६० या मोबाईल क्रमांकारावरून व्हॉट्स ऍप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करुन जिल्हा परिषदेशी सबंधित अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेज करत असलेचे निदर्शनास आले आहे. संबंधित व्यक्ति हा जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित असल्याचे भासवत आहे. अशा प्रकारचे मेसेज करुन कोणाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार झाल्यास तात्काळ संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करावी व अशा मेसेजची दखल घेऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले आहे.
जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने बनावट प्रोफाईल तयार केले असून ९४७८२५६००६० या क्रमांकावरून जिल्हा परिषदेशी सलग्नीत काही अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेजेस प्राप्त झाले आहेत. संबंधित व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित असल्याचे भासवत आहे.या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सबंधिताच्या कोणत्याही मेसेजला बळी न पडता असा प्रकार निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे