संशयित व्यक्तीला ४ तास बसवून ठेवल्याने ६ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन,पोलिस विभागात खळबळ
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संशयित व्यक्तीला पोलिस स्टेशन मध्ये विनाकारण ४ तास बसवून ठेवल्याने ६ पोलिस शिपायांच्या तडकाफडकी निलंबन केल्याने पोलिस विभागात खळबळ माजली आहे.
वर्ध्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला ४ तास पोलिस स्टेशन मध्ये विनाकारण बसवून ठेवल्याने सहा पोलिस शिपायांना तडकाफडकी निलंबित केले आहे.भहे सहाही पोलिस समुद्रपुर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.जिल्हा पोलिस अधीक्षक नुरून हसन यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.