मुख्यमंत्र्यांसह ५ डिसेंबरला होणार २० जणांचा शपथविधी, कोणाला मिळणार कोणती मंत्रीपद?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर होईल असं सांगितलं जातंय. यावेळी मुख्यमंत्र्यांसह किमान २० जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजप एकनाथ शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नाही. पण नगरविकास खातं देण्यास तयार आहे. त्यासोबत केंद्रात एक मंत्रिपद देण्याचीही भाजपची तयारी आहे. या आधी दिल्लीच्या बैठकीत खाते वाटपावरही खलबतं झाली.
गृहखातं देवेंद्र फडणवीस स्वत:कडे ठेवणार असून त्या सोबतच सामान्य प्रशासन, महसूल, ऊर्जा खातं, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वनखातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन खातं भाजपकडे जाण्याची शक्यता आहे.
सध्या जी खाती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे होतीच. तीच ज्यात अर्थ खातं, मदत आणि पुनर्वसन, सहकार खातं, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास मंत्रालय हीच खाती पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात.
शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग मंत्रालय, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, शिक्षण, सांस्कृतिक विभाग ही खाती मिळू शकतात