भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

असहायतेचा फायदा घेत नराधमाचा भिक्षुक महिलेवर अत्याचार

अमळनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका २४ वर्षीय विवाहित भिक्षुक महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील मारवड पोलिस स्टेशन हद्दीत समोर आली आहे.

पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) यांचेवर अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी असलेली ही २४ वर्षीय विवाहित महिला सध्या भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका झोपडीत ती एकटी असताना, एकटीच असल्याचे साधत संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) याने तिला गाठले. आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पीडित महिलेले या घटनेनंतर लागलीच मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास स्वतः एसडीपीओ विनायक कोते करत आहेत. त्यांच्यासोबत मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील हे तपासात सहकार्य करत आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून आरोपी अद्याप फरार आहे मात्र पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!