तलाठी कार्यालयात तलठ्याची खुर्चीवरच हत्या, राज्यभरात खळबळ
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l तलाठी तलाठी कार्यालयात तलाठी खुर्चीवर बसलेला असताना तलाठ्यांच्या तोंडावर मिरचीची भुकटी फेकून चाकूने हल्ला केला त्यात तलाठ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना २८ ऑगस्ट बुधवार रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथे घडली .
तलाठी संतोष पवार हे आपल्या कार्यालयात खुर्चीवर बसलेले असताना आरोपी तेथे येऊन प्रथम तलाठी संतोष पवार यांच्या तोंडावर मिरचीची भुकटी फेकली व नंतर चाकूने भोसकून खून केला. फेरफार नोंद न केल्याने हत्या केल्याच सांगितलं जातंय. परंतु भावकीतला वाद आणि आपली जमीन हा तलाठी कोणाच्या नावावर करेल का? अशा मानसिक विकृतीमधून हा खून झाला”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटत असून तलाठी महासंघाच्या वतीने आज काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली असून या आंदोलनात राज्यातील महसूल विभागातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. या प्रकरणी हट्टा पोलिस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.