तासखेडा अवैध उत्खनन : पंचनाम्यांमध्ये तफावत, केली जातेयं दिशाभूल? गौडबंगाल काय?
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज| रावेर तालुक्यातील तासखेडा येथील पाटाची माती अवैध रित्या उत्खनन करून चोरून नेण्यात आली. यांचे पंचनामे करण्यात आले. यात मोठी तफावत असून दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
रावेर तालुक्यातील तासखेडा येथे मोठ्याप्रमाणावर अवैध रित्या मातीचे उत्खनन करण्यात आले. या संदर्भात शासन दरबारी तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दाखल घेत पंचनामे करण्यात आले. महसुल विभागामार्फत करण्यात अलेला पंचनामा व पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेला पंचनाना यात मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात पुरावे असताना सुद्धा कारवाई का हात नाही? यात दिशाभूल केली जात असून पाठीशी तर घातले जात नाही ना? संबंधित अधिकाऱ्यांचे काय आहे गौडबंगाल?
(भाग -३)……..!


