अंगावर टॅटू काढतायं..थांबा. तुम्हाला सरकारी नोकरीला मुकावं लागणार..
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बरेच लोक हातावर टॅटू (गोंदवून) घेतात. शहरात तर स्वतच्या अंगावर कुठेही गोंधउन घेतात. दुसऱ्याने काढला म्हणून आपणही काढू असे बहुतांश लोक टॅटू काढतात. एखादा टॅटू आपल्या अंगावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर काढतात. पण तुम्हाला माहिती आहे का, अंगावर कुठेही टॅटू काढला तर सरकारी नोकरी मिळणार नाही म्हणून. भारतात अशा अनेक सरकारी नोकऱ्या आहेत की तिथे काम करणाऱ्या लोकांना टॅटू काढण्याची परवानगी नाही.
तुम्हाला टॅटू हवा सरकारी नोकरी
तुम्ही सरकारी नोकरीचा विचार करत असाल तर, तुम्हाला टॅटू हवा की सरकारी नोकरी, या पैकी एकाची निवड करावी लागेल. कारण शरीरावर कुठेही टॅटू असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकणार नाही.
आपण सरकारी नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला जातो, इतर चाचण्यांसह लेखी परिक्षाही पास होतो शारीरिक चाचणीपर्यंत पोहोचतो, परंतु केवळ टॅटूमुळे नाकारला जातो. तुमच्या शरीरावर एकही टॅटू आढळल्यास शारीरिक चाचणीच्या वेळीही तुम्हाला सरकारी नोकरीतून नाकारले जाते. तुम्हाला सरकारी नोकरीला मुकावे लागते.
म्हणून तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर हे जाणून घेणे महत्वाचे आहे . आता खरा प्रश्न असा की टॅटू काढणाऱ्यांना नोकऱ्या का मिळत नाहीत?
शरीरावर टॅटू असल्यामुळे सरकारी नोकरी न देण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे टॅटूमुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे एचआयव्ही, त्वचा रोग आणि हिपॅटायटीस ए आणि बी सारखे घातक रोग होऊ शकतात. तसेच टॅटू गोंदवलेली व्यक्ती शिस्तबद्ध पद्धतीने काम करू शकणार नाही, कारण कामापेक्षा त्याचे छंद त्याच्यासाठी महत्त्वाचे असतील. अशा काही कारणांमुळे
टॅटू गोंदवलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरीत नाकारले जाते.