भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

“कारागृहात आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो, त्या मोबादल्यात पैसे द्या” जळगाव कारागृहातील कैद्याला पोलीसांकडून बेदम मारहाण, जिवे मारण्याची धमकी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याला पोलीसांकडून बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्हा कारागृहात घडला.”कारागृहात आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो त्या मोबादल्यात पैसे द्या” असे म्हणत खूनाच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या संशयीत आरोपी असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर अभिमान पाटील. वय ५५ वर्ष. या बंदी असलेल्या व्यक्तीस कारागृहात हिवकर नामक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना बॅरेकमधून बाहेर काढत तुम्हाला साहेबांनी बोलवले असल्याचे सांगून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने  पोलिसांनी बेदम मारहाण केली. ही घटना १५ ऑक्टोबर मंगळवार रोजी जळगाव जिल्हा कारागृहात घडली. या मारहाणीत ज्ञानेश्वर पाटील. या बंद्याला मारहाणीमुळे रक्ताची लघवी होवून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गुरुवारी १७ ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मारहाणीची वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बंदी ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा राहुल पाटील याने केला आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील ज्ञानेश्वर पाटील हे खूनाच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा कारागृहात ९ नंबरच्या बॅरेकमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.बज्ञानेश्वर पाटील यांना “आम्ही तुम्हाला जेलमध्ये प्रोटेक्शन देतो, त्या मोबदल्यात आम्हाला पैसे द्या” असे म्हणत कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी त्यांना पैशांची मागणी करीत होता. मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने मंगळवार १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२.३० ते दीड वाजेच्या सुमारास हिवकर नामक कर्मचाऱ्याने त्यांना बॅरेकमधून बाहेर काढत तुम्हाला साहेबांनी बोलवले असल्याचे सांगून तो त्यांना घेवून गेला. त्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी होवून त्यांच्या पाठीवर मारहाणीच्या खूणा दिसून येत होत्या.

दरम्यान, गुरुवारी १७ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गंभीर जखमी झालेले ज्ञानेश्वर पाटील यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला, तसेच त्यांना रक्ताची देखील लघवी झाल्यानंतर त्यांना कारागृह कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कारागृहातील बंदी आरोपी ज्ञानेश्वर अभिमान पाटील यांचा मुलगा राहुल पाटील याने या प्रकरणाची चौकशी करून हीवरकर नामक कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!