भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकावर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शाळेतील स्टॉप रूम मध्ये बोलावून एका नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका शाळेत घडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकाने शाळेतील स्टॉप रूम मध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बोलावून विद्यार्थिनीला मिठीरून तिचे चुंबन घेऊन अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याची शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एरंडोल पोलिस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!