शिक्षकाचा कुटुंबा पासून संन्यास घेण्याचा निर्णय, विरोध केल्याने पत्नीला मारहाण
वरणगाव, ता. भुसावळ. मंडे टु मंडे न्युज| जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने अचानक कुटुंब व घरदार सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने पत्नीने त्यास विरोध केला असता पत्नीला मारहाण केल्याची तक्रार भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भीमराव गोसावी हे वरणगाव जवळील दर्यापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी अचानक घरदार कुटुंब सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पत्नी सोनाली गोसावी ने विरोध केला असता संतप्त होऊन शिक्षकाने तिला मारहाण केली. या संदर्भात पत्नी सोनाली गोसावी ने वरणगाव पोलिसात पती विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
पत्नी सोनाली गोसावी व भीमराव गोसावी यांच्या मध्ये वाद झाल्या नंतर त्यांनी दि. १६ रोजी पत्नीवर हल्ला करून ते फरार झाले. त्याबाबत पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल केली होती. दोन दिवसांनी गोसावी हे वरणगाव पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी घर सोडून मंदिरात राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी पत्नीला मारहाण केल्यावर जखमी अवस्थेत पत्नीने वरणगाव पोलिस स्टेशनला पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.त्या नुसार पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरणगाव पोलिस करीत आहेत.