मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात नाटकातून कवितेची ओळख पाठाचे अध्यापन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील उपक्रमशील शिक्षक,कलाशिक्षक, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी या नाट्यीकरणातून सातवीचा मराठी विषयातील कवितेची ओळख हा पाठ घेतला. या पाठात सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटूंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते.
उदाहरणार्थ आजी ‘साज वात आणि कांद्याची पात असे यमक जुळवले तर आजोबा त्यावर ‘म्हाताराच याढतो वात ‘ अशी शब्द रचना जुळवतात तेव्हा गंमत येते. कवितेतून बोलते तेव्हा तिच्या या पक्तीतून भावा बद्दल विश्र्वास व कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी, प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजन कवीतेतून बोलण्याची धमाल उडवून देतात .लेखिकेतून या काव्य रुपी संभाषणातील गंमत जंमत प्रस्तुत नाटिकेतून मांडण्यात आली आहे.
आजोबाचा भुमिकेत प्रतिक राजपूत ,सुधीर चा भूमिकेत प्रतिक पाटील ,आजीचा भूमिकेत तेजल पारगांवकर ,आईचा भूमिकेत साक्षी सोनवणे ,ताईचा भूमिकेत रितिक्षा पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी पाठ अभिनयातून सादर केले आहे. या प्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.