तीन लाख लाच प्रकरणी एसीबीच्या कारवाईत तहसीलदार फरार, दोन दलाल ताब्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीशी संबंधित सुनावणीत पाच संचिकांवर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी एका संचिकेसाठी ६० हजार रुपये प्रमाणे ५ संचिकांचे ३ लाख रुपये मागणी करत ६० हजारांची लाच
अप्पर तहसीलदाराच्या वतीने त्याच्यासाठी घेत असताना
दोन दलालांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली असून छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात कार्यरत अप्पर तहसीलदार नितीन गर्जे मात्र फरार झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. ही घटना
छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात घडली.
१) नितीन गर्जे, वय ४५ वर्षे, पद अपर तहसिलदार वर्ग – १ , तहसिल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर रा.फ्लॅट नं १००३, माय होम सोसायटी,पोददार शाळेच्या पाठीमागे, शहानुरवाडी दर्गा,गारखेडा छत्रपती संभाजीनगर,२) खासगी इसम नितीन धुमा चव्हाण,वय ३८ वर्षे,रा.रेणुका नगर,जयअंबिका शाळेच्या पाठीमागे, शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर,३) खासगी इसम सोहेल जुबेर बहाशवान,वय २९वर्षे, रा लोटा कारंजा मरकज मस्जीद जवळ, छत्रपती संभाजीनगर अशी एसीबीने अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार मुलाचे नावे आणि त्यांचे नातेवाईकांच्या नावे असलेल्या मिटमिटा येथील प्लॉटचे क्षेत्रदुरुस्तीच्या आदेशाकरीता माहे- डिसेंबर २०२४ पासुन ५ फाईल अपर तहसिलदार कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचेकडे सुनावणी कामी,प्रलंबित होत्या. तक्रारदार सदर सुनावणी करीता माहे एप्रिल २०२५ मध्ये हजर झाले असता सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजुने लावणेसाठी अपर तहसिलदार नितीन गर्जे यांचे कामकाज पहाणारा खासगी इसम अर्थात दलाल याच्या कडुन तक्रारदार यांना लाचेची मागणी झाली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने ते तक्रार देणेकरीता लाप्रवि कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हजर झाले असता त्यांची दिनांक १३/०५/२०२५ रोजी तक्रार नोंदवून घेण्यात आली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर दि.१३/५/२०२५ रोजी आणि दि.१४/५/२०२५ रोजी शासकिय पंचासह अपर तहसिलदार नितीन गर्जे व त्याचे काम काज पहाणारा दलाल,खाजगी इसम नितीन चव्हाण यांची भेट घेवून कामाची चर्चा तक्रारदार यांनी केली. सदर भेटीत अपर तहसिलदार नितीन गर्जे याने खासगी इसम नितीन चव्हाण यांस लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याने खासगी इसम नितीन चव्हाण याने तका्रदार यांच्या मुलासह नातेवाईकांच्या प्लॉटची क्षेत्रदुरुस्ती आदेश त्यांच्या बाजुने लावणेसाठी अपर तहसिलदार नितीन गर्जे याचे वतीने प्रत्येकी फाईल ६०,००० रुपये या प्रमाणे ५ फाईलचे ३,००,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाचमागणी पडताळणी अंती दि.१५/५/२०२५ रोजी कार्यालय अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शासकिय पंच यांचेसह तक्रारदाराकडुन लाचस्विकृती सापळा कारवाईचे नियोजन केले असता खासगी इसम नितीन धुमा चव्हाण याने सदर लाचेची रक्कम अपर तहसिल कार्यालय परिसरातील पार्कीगचे काम पहाणारा खासगी इसम नामे सोहेल जुबेर बहाशवान याचेकडे देण्यास सांगीतले. त्यावेळी सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांनी खासगी इसम नामे सोहेल जुबेर बहाशवान याचे कडे सुपुर्द करुन इशारा केला असता त्यास जागीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
तहसीलदार नितीन गर्जे याने ती लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन आरोपी नितीन चव्हाण व सोहेल बाहाशवान यांचे विरोधात पो.स्टे.सिटी चौक,छत्रपती संभाजीनगर, शहर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यांची प्रक्रिया सुरु आहे. यातील आरोपीbनितीन चव्हाण व सोहेल बाहाशवान खासगी इसम यांना ताब्यात घेण्यांत आले असुन,फरार झालेल्या आरोपी अप्पर तहसीलदार नितीन गर्जे याचा शोध सुरू आहे. सदरहू कारवाई सापळा अधिकारी वाल्मीक कोरे,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा