भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

१३८ कोटींचे सोनं असलेला टेम्पो पकडला, सोनं आले कुठून..

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आता निवडणूक अधिकारी तसेच पोलिसांकडून नाकाबंदी आणि तपासण्या सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं पकडल्याने मोठी खळबळ उडाली होती मात्र हे सोनं डिलिव्हरीचं असल्याचं सांगितल जात आहे, पण सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. जप्त केलेलं सोन हे अनेक सराफी संस्थेचे असल्याचं यावेळी कमोडिटी तज्ञ अमित मोडक यांनी सांगितलं. हे सोनं नेमकं कुठून आलं आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळी नऊच्या सुमारास एक टेम्पो जात असताना त्याची चौकशी केली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या पोत्यात काही बॉक्सेस आढळले. टेम्पो चालकाची चौकशी केली असता ही ज्वेलरी असून ती मुंबई कार्यालयाकडून पुण्याच्या दिशेनं येत होती अशी माहिती मिळाली. चौकशी झाल्यानंतर निवडणूक अधिकारी तसेच इन्कम टॅक्स अधिकारी यांना देखील बोलवून त्याची तपासणी सुरू आहे.

ते सोनं अधिकृत…
या संदर्भात कमोडिटी तज्ञ अमित मोडक यांनी सांगितले  की, ” सिकव्हेल लॉजेस्ट्री म्हणून जे दागिन्यांची सर्व्हिस देत असतात त्या गाडीतून हे सोने येत होते. गाडीत जे सोनं असतं त्याची माहिती ही फक्त दोन्ही सराफांना असते. याबाबत अधिक माहिती ही चालकाला नसते. आज जे दागिने पकडण्यात आले आहेत, ते अनेक सराफी संस्थांचे दागिने असून, एका सराफी संस्थेने दुसऱ्या सराफी संस्थेला पाठवलेले हे दागिने आहेत. तसेच प्रत्येक दागिन्यांसोबत इन्व्हाईस जीएसटी पोर्टलवर पंच करून ते जनरेट झालेलं असतं आणि याची माहिती जीएसटी विभागाला असते. यात कोणतीही अनधिकृत माहिती नसते.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!