भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पालघरमध्ये भूकंप, परिसर हादरला, केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोल

पालघर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना आज दी. १५ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी 4 वाजून ४७ मिनिटे २९ सेकंद ला ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्याने पुन्हा एकदा दोन्ही तालुक्यातील गावे हादरली आहेत. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोल, डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पूर्वी गेल्या २०१८ पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा तलासरी आणि डहाणू तालुक्यातील गावे हादरली आहेत. दुपारी भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून गेले.

भूकंपाच्या केंद्रबिंदूत वारंवार बदल होत असून मंगळवारी दुपारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले असून पाच किलोमिटर खोल जमिनीत भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. झालेल्या भूकंपाचा धक्का डहाणू, तलासरी आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तसेच दादरा नगर हवेली येथील सेलवासा, खानवेळ पर्यंत बसला आहे. त्यामध्ये, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डहाणू, तलासरी परिसरातील गावांना पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!