बऱ्हाणपूर – सावदा – अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा दुचाकी – आयशर ट्रक अपघातात जागीच मृत्यू
सावदा , ता. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा-बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठा वाघोदा ते रावेर दरम्यान ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात होऊन अपघातात रावेर येथून लग्न लावून घरी परत येत असलेल्या रावेर तालुक्यातील रणगाव येथील दोन जणांचा मृत्यू झाला. ट्रॅक व चालकाला पळून जात असता महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाक्यावर पकडण्यात आले.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सावद्यापासून जवळच असलेल्या मोठा वाघोदा या गावाच्या पुढे पेट्रोल पंपाच्या जवळ वळणाच्या पुढे सावदा येथून केळी भरून जाणारा आयशर ट्रक व रावेर येथून लग्न सोहळा आटपून दुचाकीवर घरी परत येणारे रावेर तालुक्यातील रणगाव येथील दुचाकीवर असलेले नितीन धनराज कोळी व नितीन रामलाल कोळी. दोघांचे वय ४० वर्ष. दोघे राहणार रणगाव यांचा जागीच मृत्यू झाला,अपघात झाल्यानंतर ट्रक पसार होण्याच्या मार्गावर असताना मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर त्याला पकडण्यात आले व सावदा पोलीस स्टेशन मध्ये ट्रक आणण्यात आला. दोघांचे मृतदेहांचे छवविच्छेदन करण्यासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेने तापी काठ असलेल्या रणगांव परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.