सावदा – भुसावळ रस्त्यावर भीषण अपघात, कारची झाडाला धडक, रावेर येथील ३ ते ४ जण ठार तर २ गंभीर जखमी
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा – भुसावळ रस्त्यावरील सावदा – पिंपरुड रस्त्यावर होंडा सिटी कारने झाडाला ठोस दिल्याने मोठा अपघात झाला, या भीषण अपघातात तीन ते चार जण जागीच ठार झाल्याचे समजते. रावेर शहरातील शुभम सोनार,वय २५ वर्ष,मुकेश रायपूरकर, वय २३ वर्ष व जयेश भोई हे जागेच ठार झाले. तर इतर गणेश भोई (फोटोग्राफर) सह आणखी एक गंभिर जखमी असुन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणाऱ्या MH 20 CH 8002 या क्रमांकाच्या होंडा सिटी गाडीने सावदा – भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड सावदा दरम्यानच्या रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला , होंडा सिटी कार गाडीचे मशीन चे पार्ट – पार्ट जवळ जवळ १०० ते १५० फूट अंतरावर विखुरले गेले. या कार मध्ये ५ ते ६ जण असल्याची माहिती मिळत असून त्यातील तीन ते चार जण ठार झाल्याने समजते. कार ने ज्या झाडाला धडक दिली त्या झाडाची संपूर्ण साल निघून गेली आहे. ही कार रावेर येथील असल्याचीही माहिती मिळत आहे. ते मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून येत होते .