भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : महामार्गावर भीषण अपघात, रक्ताचा सडा, ७ जागीच ठार, चार गंभीर

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रात्री ११ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. जालन्यामधील कडवंची गावाजवळ दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यामधील कडवंची गावाजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा कारला राँग साईडने येणाऱ्या लिफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसून हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारनं धडक दिल्यामुळं अर्टिगा कार आणि स्विफ्ट कार महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. या भीषण धडकमेमुळे ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते. नागपूरवरून येणाऱ्या कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारमधील दोघांनी जीव गमावला.

विरुद्ध दिशेने येणारी ही कार स्थानिक लोकांची होती, अशी माहिती मिळत आहे. गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी ते विरुद्ध दिशेने येत होते. तर नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणारी कार अतिशय वेगात होती. दोन्ही कारची जोरदार टक्कर झाली. हा अपघात अतिशय भीषण होता. त्यामध्ये कारचाही अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यामध्ये सह जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH.12.MF.1856 मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रं. MH.47.BP .5478 ला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.


या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं. मात्र अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाला. त्यामुळं मृतांची संख्या वाढल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिलीय. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!