Breaking : केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ही कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
केतकी चितळेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केलीये. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली. याप्रकरणी आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर पोलीस केतकी चितळे हिला ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.
- “गाव आपला – उत्सव आपला” पाडळसे गावात रामनवमी उत्सव जल्लोषात – तरुणाईच्या पुढाकारातून एकतेचा नवा संदेश
- सावदा नगरपालिकेतून माहिती देण्यास टाळाटाळ, गौडबंगाल काय?
- कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या १० गाईंची सुटका, रावेर पोलिसांची कारवाई
अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. केतकी चितळेविरोधात आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.