29 महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान कधी? निकाल कधी? वाचा सविस्तर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून मताधिकार हे अॅप तयार करण्यात आलं आहे. ज्यांचं दुबार मतदान आहे, त्यांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं आहे, ज्यांचं नाव दुबार असेल त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल असंही यावेळी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तसेच मतदार यादितील दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा असणार आहे, तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी होणार आहे, तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निवडणुका आणि एकूण जागा
- नाशिक महानगरपालिका – 122
- अहिल्यानगर महानगरपालिका – 68
- धुळे महानगरपालिका – 74
- जळगाव महानगरपालिका – 75
- मालेगाव महानगरपालिका – 84
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
- नामनिर्देश स्वीकारण्याचा कालावधी : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- छाननी : 31 डिसेंबर
- माघारीची मुदत : 2 जानेवारी
- चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी : 3 जानेवारी
- मतदान : 15 जानेवारी
- मतमोजणी : 16 जानेवारी
- आजपासून आचारसंहिता लागू
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेवर मर्यादा येणार आहेत. महापालिका निवडणुकांची घोषणा होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून तयारीला वेग येत आहे. उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनिती यावर चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात राज्यातील शहरी राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत. - निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका आणि एकूण जागा-
- बृहन्मुंबई – 227
- भिवंडी-निजामपूर – 90
- नागपूर – 151
- पुणे – 162
- ठाणे – 131
- अहमदनगर – 68
- नाशिक – 122
- पिंपरी-चिंचवड – 128
- औरंगाबाद – 113
- वसई-विरार – 115
- कल्याण-डोंबिवली – 122
- नवी मुंबई – 111
- अकोला – 80
- अमरावती – 87
- लातूर – 70
- नांदेड-वाघाळा – 81
- मीरा-भाईंदर – 96
- उल्हासनगर – 78
- चंद्रपूर – 66
- धुळे – 74
- जळगाव – 75
- मालेगाव – 84
- कोल्हापूर – 92
- सांगली-मिरज-कुपवाड – 78
- सोलापूर – 113
- इचलकरंजी – 76
- जालना-
- पनवेल – 78
- परभणी – 65


