सावदा येथील मोठा मारुती मूर्तीची संवर्धन प्रक्रिया, सव्वा सात क्विंटल शेंदूर काढला
सावदा.ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा शहरातील गांधी चौक येथील शेकडो वर्षांपासून च्या पुरातन मोठा मारुती ची संवर्धन प्रक्रिया विधी पूर्वक करण्यात येऊन सव्वा सात क्विंटल शेंदूर काढण्यात आला .
सावदा शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या परिसरात मोठा मारुती म्हणून ओळख असलेल्या पुरातन मोठा मारुती ला शेकडो वर्षांपासून शेंदूर लावण्याची प्रथा आहे. या मारुतीच्या मूर्तीला अती प्राचीन काळापासून असलेल्या मूर्तीला शेंदूराचे मोठे कवच झाले असल्याने मूळ मूर्तीचे स्वरूप दिसण्यासाठी आजपर्यंत न काढण्यात आलेले शेंदुराचे कवच विधिपूर्वक काढण्यात आले. यातून मारुतीचे मूळ स्वरूप समोर आले. आज पर्यंत मारुतीला लावण्यात आलेल्या शेंदूर कवचाचे वजन तब्बल ७२५ किलो वजन भरले. मारोतीच्या मूर्तीवरील काढलेला हा सव्वा सात क्विंटल शेंदूर तापी नदीत विधिपूर्वक विसर्जित करण्यात आला.
या वेळी पूजा, अभिषेक करून विधिपूर्वक मारुती मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पार पडल्या नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर विधी कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी गांधी चौक मित्रमंडळाने परिश्रम घेतले.