देशातील सर्वात मोठा महामार्ग खचला, महामार्ग खाचाण्याला उंदीर जबाबदार, कर्मचाऱ्याचा अजब व हास्यस्पद दावा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून हा महामार्ग बांधणाऱ्या केसीसी बिल्डकॉन या कंपनीचा कनिष्ठ कर्मचाऱ्याने रस्ता खचल्याबद्दल उंदरांना जबाबदार धरले होते. हा महामार्ग उंदरांमुळे खचला. असा अजब आणि हास्यास्पद दावा केल्याने या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता कंपनीने सदर कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे.हा खड्डा १० फूट एवढा मोठा होता.
मुंबई – दिल्ली या एक्सप्रेस वे च्या दौसा भागातील भांडारेज टोलजवळ अचानक रस्ता खचला आहे. यामुळे तिथे मोठा खड्डा पडला आहे. माहिती मिळताच तातडीने बॅरिकेड्स लावून खड्डा बुजविण्यात आला. हा खड्डा का पडला याचा तपास केला असता उंदीर किंवा तत्सम जीवाच्या बिळामुळे पावसाचे पाणी तिथे साठले आणि रस्ता खचला.
असाच एक प्रकार महाराष्ट्रात या पूर्वी घडला होता. २०१९ च्या जुलै मध्ये चिपळुणातील तिवरे धरण फुटले होते. तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार होते. या वेळी हे धरण का फुटले या बाबत खेकड्यांनी तिवरे धरण फोडल्याचा तर्क तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी काढला होता. याची खूप चर्चा झाली होती.