सोन्या – चांदीच्या भावात घसरण, सर्व सामन्यांना दिलासा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ऐन लग्नसराईत सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. अशातच आज सोमवार २८ एप्रिल रोजी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २८ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९५,२८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,३४० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९६,६९० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९६७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
काही प्रमुख शहरातील सोन्याचे दर
मुंबई — २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,१८४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे — प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१८४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,११० रुपये आहे.
नाशिक — प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१८४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,११० रुपये आहे.