राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात, प्राथमिक शाळा आज बंद राहणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावणेदोन लाख प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार असून जवळ जवळ ४० हजार शाळा आज बंद राहतील. त्या मुळे राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात सापडणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि २९ हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत.
या संदर्भात संघटनांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नेअसल्याने शिक्षण संगटनांनी ह निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक या आंदोलनात उतरले आहेत. आज विविध मुद्द्यांवर राज्यातील शिक्षक आंदोलन करणार आहेत. त्यात कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे आदी विषय असून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन आहे.