भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आठव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ, किती होणार वाढ?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हा आयोग २०२६ पर्यंत स्थापन केला जाईल. अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर गेला आहे.

अहवालानुसार आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ निश्चित केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती ५१,४८० रुपये होऊ शकते. सध्या किमान मूळ वेतन १८,००० रुपये आहे. यासोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही हाच लाभ मिळणार आहे. त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या ९००० रुपयांवरून २५,७४० रुपयांपर्यंत वाढणार आहे.

वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी २०१६ मध्ये वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा दहा वर्षांचा होता. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता आणि तो डिसेंबर २०२५ मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!