भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

ब्रेकिंग : जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना अटक

जळगाव, मंडे टू मंडे न्युज|जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत नवनवीन घडामोडींना वेग येत असताना त्यातच आता जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी दुध संघाच्या कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष वाढला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचार्‍यांवर जबाब बदलण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी फिर्याद दाखल न करून घेतल्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने राज्याचे गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी दिली होती. यानंतर आज दुध संघासाठी अर्ज छाननी करण्यात आल्यानंतर रात्री दुध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यानाच्या कालखंडात जळगाव जिल्हा दुध संघात मध्यंतरी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. यात मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य दहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर विद्यमान संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. या प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध आणि लोणी यांच्या विक्रीत अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. तर संचालक मंडळाने हा अपहार नसून चोरी असल्याचा युक्तीवाद करून दुसरी तक्रार नोंदविली होती. यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्थानकात ठाण मांडून आंदोलन केले होते.

या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील ( वय ६७); किशोर काशिनाथ पाटील ( वय ५७) आणि अनिल हरीशंकर अग्रवाल ( वय ५९) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तत्कालीन अन्य कुणा संचालकांवर देखील याच प्रकारची कार्यवाही होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!