भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेस प्रारंभ, सातपुडा पर्वत रांगातून येते एक अदृश्‍य ज्योत.. आणि…

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेस आज शनिवार दि. १  फेब्रुवारी २०२५ पासून सुरवात होत आहे. यंदाची यात्रा ही ३ फेब्रुवारी, ८ फेब्रुवारी व १० फेब्रुवारी अशी आहे हा यात्रा उत्सव माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत दिनांक १२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
आज यात्रेचा पहिला व माघ शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवार अशा या दोन दिवसासह पौर्णिमेस यात्रा असते.

सातपुडा पर्वत रांगातून एक अदृश्‍य ज्योत येते व मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी, व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते अशी आख्यायिका असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेले अट्रावल (ता. यावल) येथे मुंजोबा मंदिरात शनिवारपासून यात्रोत्सव सुरू होत आहे. जिल्ह्यात हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे जिल्ह्यासह राज्यातून भाविक येथे येत असतात.

अट्रावल येथील मुंजोबा मंदिर पुरातन असून किमान तीन -साडे तीनशे वर्षापूर्वीचे असल्याचे वृद्ध, जाणकार सांगतात. अट्रावल- भालोद रस्त्यावर रस्त्याच्या कडेला एका ओट्यावर असलेल्या मंदिरास पूर्वी पत्री शेड होते. तेथे आता स्लॅबचे शेड आहे.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतांमध्ये मान देणाऱ्या (नवस फेडणे) भाविकांचीही गर्दी असते. नवस फेडणारे मंदिरावर पितळी घंटा दान म्हणून देण्याची परंपरा आहे. मुंजोबास दहीभात चढवून मंदिर परिसरात वरण बट्टी व चुरम्याचा नैवेद्य दाखवितात.

यात्रोत्सव काळात मुंजोबावर वाहिलेले लोणी, पूजाअर्चाचे निर्माल्य साहित्य माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत आपोआप जळून खाक होते.

यावल तालुक्यातील अट्रावल येथील  श्री मुंजोबा नवसाला पावणारे दैवत आहे. यामुळे भाविकांची श्रद्धा असल्याने येथे यात्रेत अनेक जण नवस फेडण्यासाठी येथे येतात. त्यानिमित्ताने आप्तेष्ठांसह मित्रमंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. यात्रेत आकाश पाळणे विविध संसारोपयोगी वस्तूंसह मनोरंजनाची दुकाने थाटली आहेत.यावल येथून सहा किलोमीटर व अट्रावल- भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते, याशिवाय भुसावळ- यावल रोडवर राजोरा फाट्यावरून अट्रावल येथे जाता येते. 

कसे जावे …. यावल येथून सहा किलोमीटर व अट्रावल- भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते, याशिवाय भुसावळ- यावल रोडवर राजोरा फाट्यावरून अट्रावल येथे जाता येते. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!