भुसावळ येथे शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यास सुरुवात…
कुंभारखेडा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज, योगेश कोष्टी l राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंबलबजावणी सुरू असून त्याच दृष्टिकोनातून शिक्षकांचे द्यान अद्यावत व्हावे यासाठी भुसावळ येथील प क कोटेचा विद्यालयात प्रशिक्षण वर्ग सुरू असून त्याचा अंतिम टप्पा आजपासून सुरू झाला आहे.
शालेय शिक्षण स्तरावर शिक्षक वर्गाचे सक्षमीकरण करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हा यामागचा उद्देश आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यभर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.
या नुसार भुसावळ तालुक्यात पंचायत समिती मार्फत हे प्रशिक्षण सुरू असून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे सर आणि समन्वयक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली इमरान खान इस्माईल खान इमरान खान इस्माईल खान, श्रीमती स्मिता जयकर, सुरेश परदेशी , अर्चना खाचने, नीलिमा पाटील, शाम दुसाने, हर्षद महाजन , मनीषा देशमुख , प्रवीण महाजन हे सुलभक परिश्रम घेत आहे . शेवटच्या या अंतिम टप्पात एकूण १६० प्रशिक्षणार्थी उपस्थित असून हे प्रशिक्षक पाच दिवस चालणार आहे.