भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना सरकार देणार होळीचं “गिफ्ट”! महायुती सरकारचा मोठा निर्णय, काय आहे वाचा …

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आणली. “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ” या योजने द्वारे लाडक्या बहिणीना दरमहा १५०० रुपये द्यायला सुरूवात केली. आणि राज्यभरातील महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भरभरून मतदान केलंय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केलंय. काही दिवसांवर होळीचा सण येवून ठेपलाय. त्या अगोदरच सरकारने लाडक्या बहि‍णींना होळी सणानिमित्त एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय.

होळी सणानिमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप केलं जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना या साड्या दिल्या जाणार आहे. यासंदर्भात राज्याच्या पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत.

महायुती सरकारचा होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यामधील रेशन दुकानात या साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. होळीच्या सणापर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांला एक साडी दिली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ३०२ महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागामधील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना ही साडी मिळणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे अंत्योदय गटातील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी दिली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!