महायुतीत धुसफूस? भाजप मित्रपक्षांवर नाराज? मित्रपक्षांनी काम केलं नसल्याच्या तक्रारी, उपाय योजना न केल्यास विधानसभेला फटका?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भाजपच्या बैठकीत आपल्या मित्र पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली गेली. शिवसेना व राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत काम केलं नाहीत.असाही आरोप काही भाजपच्या नेत्यांकडून केला गेला. भाजपच्या बैठकीत वरिष्ठांकडे या विषयी पाढाच वाचला गेला. महायुतीच्या मित्रपक्षाच्या काही नेत्यांनी भाजपा उमेदवारांचे काम केलं नसल्याच्या तक्रारी केल्या गेल्याची माहिती मिळाली आहे. या बाबत गंभीर दखल घेत उपाय योजना न केल्यास विधानसभेला फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली गेली.
कोणामुळे कोणाला फटका?
शिवसेनेतील काही नेत्यांमुळे पालघर व जालना मध्ये फटका बसल्याचा आरोप केल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही नेत्यांनी महायुतीच्या भाजप उमेदवारां ऐवजी महविकास आघाडीच्या उमेदवारांचं काम केल्याचा आरोप करण्यात आला. अजित पवार राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांमुळे दिंडोरी, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बुलढाणा, या ठिकाणी फटका बसल्याचा ही सांगितलं गेलं.