फैज़पुर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे घवघवीत यश
बलवाड़ी, ता. रेरावेर. मंडे टु मंडे न्युज, आशीष चौधरी |
प्राज्ञमध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थी कन्हया कोठी व विशारदमध्ये प्रथम विद्यार्थि शीतल भोजने व शास्त्रीमध्ये प्रथम विद्यार्थी निकिता वायंदेशकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाच्या २०२४-२०२५ परीक्षेतील प्राज्ञ ,विशारद ,शास्त्री या वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे.
फैज़पुर येथील श्रीचक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडल संचालित श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय २०२४-२०२५ या वर्षात एकुन ११५ विद्यार्थयानी परीक्षा दिली यात प्राज्ञमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कन्हया कोठी व विशारदमध्ये शीतल भोजने व शास्त्रीमध्ये निकिता वायंदेशकर यांनी विशेष प्राविण्य मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीचक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्कृत ही भाषा केवळ शैक्षणिक विषय नाही तर ती भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, आणि साहित्य यांचे मूळ आहे. म्हणूनच अशा पदवीधारकांची समाजात भूमिका फार महत्त्वाची ठरते. संस्कृत अभ्यासक म्हणून आपल्या कार्यातून ते भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव संतराज आराध्य व्यक्त केली.
या वर्षी १० जनानी संस्कृत शास्त्री ही पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्ती संस्कृतभाषेतील प्राचीन परंपरा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. संस्कृत हा भारतीय संस्कृतीचा पाया असून या क्षेत्रात पदवी मिळवणाऱ्यांची नोंद नेहमीच कौतुकास्पद ठरते.
संस्कृतभाषेतील सखोल अध्ययनाचा सन्मान मिळविला आहे, जे आपल्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. संस्कृत शास्त्रातील पदवी हा प्राचीन भारतीय विद्या विषयांचा अभ्यास असून, यात वेद, उपनिषद, शास्त्र, इतिहास, आणि भाषाविज्ञान आदींचा समावेश होतो. या पदवीमार्फत त्यांचा संस्कृत मध्ये तज्ज्ञतेचा दर्जा सिद्ध झाला आहे.
या परीक्षे साठी विद्यालयाचे प्राचार्य गौरव आराध्य प्रा.गोविंद आराध्य ,प्रा.सोनाली नागापुरकर ,लिपिक प्रदीपराज पंजाबी ,प्रा.शैलेशमुनी महानुभाव व वस्तिगृहाचे व्यवस्थापक सदानंद मुनी मराठे यानी अथक परिश्रम घेतले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा