फैजपूर शहरातील हाय मास्ट लाईट ठरताहेत “शो पीस” अधिकारी सुस्त..नगरपालिका मस्त…!
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शहरातील प्रमुख रस्ते व कॉलन्या, नगर, या भागातील हायमास्ट लाईट गेल्या ६-७ महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. नगरपालिका कर्मचारी म्हणतात हे आमचे काम नाही ते ठेकेदाराकडे बोट दाखवितात. ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. यावल रोड, मुख्य बाजारपेठ, विद्यानगर या भागात हायामास्ट दिवे लावण्यात आले आहेत या भागातील दिवे त्वरीत सुरु करावे अशी नागरीकांची मागणी आहे. काम जरी ठेकेदाराचे असेल तरी ठेकेदाराला वठणीवर आणणे हे काम नगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांचे आहे. पालिकेचा यावर कुठलाही अंकुश नाही. अधिकारी ठेकेदाराला या संदर्भात का बोलत नाहीत. यांचे काही लागे बांधे तर नाही ना?
फैजपूर शहरातील विविध भागात या हायमास्ट लाईट बसविण्यात आले. मात्र हे लाईट बंद आहेत वारंवार ठेकेदाराला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. ठेकेदाराकडून उडवा उडवाची उत्तरे देण्यात येतात. या तक्रारीची दखल कोणी घेत नसेल तर हे पोल ( हायमास्ट ) लाईट येथून हलवून टाकावेत अशी विद्यानगर भागातील रहिवांशाची तक्रार आहे. गणेश उत्सव व दुर्गोत्सव या वेळे पासून हे हायमास्ट लाईट बंद अवस्थेत आहेत या बाबत तक्रार करून ही कोणी याची दखल घेत नाही. नगरपालिका म्हणते ही जबाबदारी आमची नाही. विज वितरण कंपनी म्हणते ते आमचे काम नाही तर मग ठेकेदार यांना सांगून ही आज करतो, उद्या करतो असे उत्तरे मिळत आहे. वारंवार सांगून देखील याबाबत दुर्लक्ष करण्यात येते. तक्रार करूनही रहिवांशी अक्षरशा कंटाळले आहेत.
या परिसरातील हायमास्ट फक्त देखावा आहे. जर का ठेकेदार हे काम पूर्ण करू शकत नसेल तर सार्वजनिक ठिकाणाहून ते दुसरीकडे हलविण्यात यावे अशी रहिवांशाची मागणी आहे. हायमास्ट लाईट बंदच असतील तर त्याचा काय उपयोग? ते फक्त ‘शो पीस ‘ ठरले आहे . नगरपालिकेने बसविलेले लाईट सुद्धा बंद अवस्थेत आहेत. शहरातील यावल - रावेर या मुख्य रस्त्यावरील मार्गावर वाहतुकीची मोठी रहदारी असते. सुभाष चौक नेहमी गजबजलेला असतो मात्र येथील हायमास्ट लाईट बंद असल्या
ने सुभाष चौकात रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे
हायमास्ट लाईट बंद असल्या बाबत वारंवारसांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते याचे नवल फैजपूर वाशीयांना वाटते.शहरातील मुख्य चौक व छोटे-मोठे राजकीय पदाधिकारी
, नेते, स्थानिक
पुढारी,अधिकारी
यांच्या घराजवळच हायमास्ट लाईट मात्र सुरू असतात इतर ठिकाणी ते
बंद
.आहेत. ठेकेदार या प्रकाराकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याची ओरड येथील रहिवाशां कडून केली जात आहे.