जळगाव

रावेर मध्ये सर्वाधिक 73 टक्के च्या वर तर मुक्ताईनगर,जामनेर मध्ये 70 टक्के च्या वर मतदान,जळगाव जिल्ह्यात 65.77 टक्के मतदान

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच काल दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रात्री उशीरा जळगाव जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या टक्केवारीची माहिती जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यात 11 मतदार संघा पैकी रावेर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 73.84 टक्के मतदान झाले तर त्या खालोखाल मुक्ताईनगर मध्ये 70.71 टक्के,तर जामनेर मध्ये 70.55 टक्के मतदान झाले.

विधानसभा निवडणुकी साठी जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात काल सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सकाळपासून धीम्या गतीने मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले मात्र बऱ्याच केंद्रांवर दुपार पासून गर्दी झाल्याने रात्री उशिरा पर्यंत मतदान सुरू होते.

म्हणून जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा मतदानाची अचूक आकडेवारी जाहीर केली.जळगाव जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात 11 मतदार संघा पैकी रावेर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 73.84 टक्के मतदान झाले तर त्या खालोखाल मुक्ताईनगर मध्ये 70.71 टक्के,तर जामनेर मध्ये 70.55 टक्के मतदान झाले.

मतदारसंघनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

चोपडा : 66.57 टक्के

रावेर : 73.84 टक्के

भुसावळ : 57.75 टक्के

जळगाव शहर : 54.95 टक्के

जळगाव ग्रामीण : 69.33 टक्के

अमळनेर : 65.61 टक्के

एरंडोल : 68.86 टक्के

चाळीसगाव : 61.67 टक्के

पाचोरा : 68 : 32 टक्के

जामनेर : 70.55 टक्के

मुक्ताईनगर : 70.71 टक्के

यानुसार मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून  दिनांक 23 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून यात नेमके कोण बाजी मारणार ? हे वेळीच कळणार.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!