रोहिणी खडसेनी सुरू केलेला जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद– अजित पवार
जळगाव/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावांत वस्त्यांवर पाड्यावर जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधणे त्यांचे प्रश्न समजून घेणे त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवणे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात 15 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे
भारताच्या संविधान स्विकृत दिनी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी पुर्ण होईल मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या 182 गावांमध्ये हि यात्रा जाणार आहे दि 14 सप्टेंबर पर्यंत हि यात्रा बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील 57 गावांमध्ये आतापर्यंत पोहचली असून या ठिकाणचा नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे या यात्रेदरम्यान रोहिणी खडसे आणि पक्षाचे पदाधिकारी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत जात आहेत, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत छोट्या मोठ्या समस्या तात्काळ तिथल्या तिथे मार्गी लावत आहेत मोठ्या समस्या किंवा सार्वजनिक प्रश्नांबाबत संबंधित कार्यालयाशी, विभागाशी संपर्क साधून एकनाथराव खडसे, रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत
आज दि 15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, रोहिणी ताई खडसे यांचा जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद आहे कष्टकरी शेतकरी माय भगिनी आणि युवकांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी आपल्या भेटी हे ब्रिदवाक्य घेऊन सुरू केलेली जनसंवाद यात्रा पक्षवाढी साठी आणि जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी एक संधी आहे आता आपण विरोधी पक्षात आहोत जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेता येतील त्या सोडविण्याचा प्रयत्न करता येईल रोहिणी खडसे या हे करत आहेत यातून निश्चितच पक्ष घराघरात जाईल तर नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करावी प्रत्येकाच्या यात्रेच्या समारोपाला मी येईल रोहिणी खडसे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोप समारंभाला 1 डिसेंबर 2022 रोजी मी स्वतः उपस्थित राहील असे अजित पवार यांनी सांगितले
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, आ अनिल पाटील, माजी मंत्री सतिष अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, साहेबराव पाटील, जगदीश वळवी, एजाज मलिक, विलास पाटील, नामदेवराव चौधरी, संदिप पाटील, अशोक लाडवंजारी, रवींद्र नाना पाटील, वंदना चौधरी,उमेश नेमाडे, अरविंद चितोडीया, सोपान पाटील, मजहर पठाण, मंगला पाटील, तिलोत्तमा पाटील, कल्पना पाटील,इंदिरा पाटील, अरविंद मानकरी,ललित बागुल,अभिषेक पाटील, योगेश देसले,रिंकू चौधरी, वाल्मिक पाटील, संजीव पाटील, ईश्वर रहाणे, यु डी पाटील, विशाल महाराज खोले, रामदास पाटील, डॉ बी सी महाजन, विजय चौधरी,अक्षय चौधरी, अजय पाटील नईम खान लता सावकारे, माया बारी,अमोल महाजन, श्रीकांत चौधरी व जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते