भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावयावलरावेर

सावदा – पिंपरूड दरम्यानच्या रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा अखेर मृत्यू

फैजपूर/सावदा. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले वैद्यकीय प्रतिनिधी कुलदीपसिंह सुभाष पाटील (३२, रा. द्वारकानगर, जळगाव. मूळ रहाणारं – अमळनेर ) यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी दि. ६ रोजी सकाळी मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून ते गंभीर अवस्थेत असल्याने त्यांचेवर उपचार सुरू होते.

जळगाव येथील औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी असलेले पाटील हे २८ ऑगस्ट रोजी कामावर असताना कंपनीच्या कामा साठी फिरत असताना रावेर, यावल तालुक्यातील सावदा – पिंपरूड दरम्यान च्या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात भरघाव चारचाकी वाहनाने धडक दिली होती. यात त्यांच्या हात-पायाचे हाड मोडण्यासह मोठी दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मूळचे अमळनेर तालुक्यातील चांदणी कुन्हे येथील रहिवासी असलेले कुलदीपसिंह पाटील हे सध्या जळगाव शहरातील द्वारकानगर परिसरात आई वडील, पत्नी व चिमुकल्या मुलीसह राहत होते. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!