भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

न्यायमूर्तीच निघाला लाचखोर, ५ लाखांची लाच घेताना न्यायाधीशाला रंगेहाथ अटक, न्यायपालिका श्रेत्रात खळबळ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l न्यायपालिका श्रेत्राच्या विश्वासाला तडा देणारी एक मोठी धक्कादायक घटना सातारा न्यायालयातून समोर आली असून न्याय देणाराच लाच प्रकरणात अडकला आहे. पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सातारा न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. या घटनेत न्यायाधीशानेच लाच घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू असून न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला तडा गेला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामिन अर्जाबाबत मदत आणि जामिन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिली होती. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाविरोधात गुन्हा नोंद झाला होता. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला होता. तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामिन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसंच जामिन अर्जाबाबत मदत करणं, जामिन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली

जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असं सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

न्यायपालिका श्रेत्राला हादरा देण्यासह काळीमा फासणारी मोठी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. न्यायालय परिसरातच न्यायाधीशांसह त्यांच्या पंटरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

यात फिर्यादीच्या वडिलांच्या जामीनासाठी लाच मागण्यात
आली होती.वास्तविक आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार विरोधात न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिक
न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असतो. अशावेळी पुणे आणि सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांविरोधातच
गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय
निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना तिघांना रंगेहात पकडल्याने राज्यातील न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


या घटनेतील फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी
लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्हा
सत्र न्यायालयाच्या आवारातच या घटना घडामोडी घडत
होत्या. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने सर्वांना रंगेहात पकडले आहे. मात्र या सर्व घटनेमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आता न्यायाधीश यांच्यावरच लाच घेतल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे आता विश्वास कोणावर
ठेवायचा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. न्यायपालिकेतील न्यायाधीशच अशा प्रकरणात अडकल्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडालेली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!