ऑनलाईन ट्रेडींग मध्ये चांगला नफ्याचे आमिष : ६ लाखात फसवणूक !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : ट्रेडींग कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडींग सुरु करण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची ५ लाख ७६ हजार १५१ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ट्रेडर काजल इंस्टाग्राम खातेधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत त्यांना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवरील ट्रेडर्स काजल या फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम अकाउंटधारकाने सचिन अशोककुमार मंदान (वय-२५) रा. एक्झोटीक अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव यांना ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देईल असे आमिष दाखविले.
सचिन मंदान यांच्याकडून समोरील अनोळखी व्यक्तीने डिमॅट खात्याचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अज्ञात व्यक्तीने मंदार यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सचिन मंदार यांनी ५ लाख ७६ हजार १५१ रूपये भरले. यात त्यांना एकाही रूपयांचा फायदा झाला नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी जळगाव सायबर पोलीसात तक्रार दिली आहे.
ट्रेडर्स काजल फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहे.