भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिकसामाजिक

‘अंतर्नाद’ च्या महावकृत्व स्पर्धेने होतेय शिवसंस्कारक्षम समाजाची पायाभरणी : वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे, कारण ते संस्कारक्षम समाजासाठी महत्त्वाचे आहेत. ‘अंतर्नाद’ महावकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शिवसंस्कारक्षम समाजाची पायाभरणी करत आहे. संवादकौशल्याच्या अभावामुळे अनेक तरुण मागे पडतात, आणि अशा स्पर्धांमुळे त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते. हे स्पर्धात्मक वातावरण त्यांच्यात जिद्द निर्माण करून योग्य दिशा देते. युवकांच्या आत्मविश्वास वाढीसाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘अंतर्नाद’ प्रभावी कार्य करत आहे. मी स्वतः अशा स्पर्धांमधून शिकत घडलो आहे, असे ना. संजय सावकारे यांनी सांगितले.

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने जळगाव जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे आठवे वर्ष होते, ज्यामध्ये जिल्ह्यातील ७७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम फेरी १९ फेब्रुवारीला झाली, तर अंतिम फेरी बक्षीस वितरणापूर्वी पार पडली. पाच गटांतील २५ विजेत्यांसह सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचा बुधवारी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पारोळा नगरपरिषद मुख्याधिकारी किशोर चव्हाण, ग. स. सोसायटी जळगावचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, ताप्ती एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश फालक, उद्योजक किरण महाजन, जी. एस. चौधरी विद्यालय वरणगावचे मुख्याध्यापक एम. आर. चौधरी आणि ग. स. सोसायटी संचालक अजय देशमुख यांची उपस्थिती होती.

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच गटांमधील प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांचा समावेश असून, एकूण ७५ विद्यार्थ्यांची अंतिम फेरी रविवारी नहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये पार पडली. परीक्षक म्हणून सुरेश अहिरे, दिनकर जावळे, प्रकाश विसपुते, प्रमोद आर्य, शैलेंद्र वासकर, तृपतीराम करनकाळ, विलास पाटील, भटू चौधरी, निळकंठ खाचणे, निलेश गुरुचल, कांचन चौधरी आणि रवींद्र पाटील यांनी भूमिका बजावली.

अंतिम फेरी संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तक असे बहुमान स्वरूपात बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन यांनी केले. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कुंदन वायकोळे आणि देव सरकटे यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देऊन सहपरिवार गौरव करण्यात आला. तसेच, स्पर्धेच्या ४८ परीक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे यांनी मानले.सन्मानपत्राचे वाचन ललित महाजन, विक्रांत चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठीप्रकल्प सह समन्वयक राहुल भारंबे, योगेश इंगळे, अमितकुमार पाटील, समाधान जाधव, अमित चौधरी, प्रा. डॉ. श्याम दुसाने, केतन महाजन, राजेंद्र जावळे, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, विपीन वारके, कपिल धांडे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते

पहिला गट ( इयत्ता १ ली , २ री )
प्रथम – आराध्या गणेश पाटील (जी.पी.विद्यालय, जळगाव), द्वितीय – हंसला तौसीफ शेख (सेंट आलोयसिस प्राथमिक मराठी शाळा भुसावळ), तृतीय- लक्षिता शैलेश माळी (सेंट अलाईसेस कॉन्व्हेंट स्कूल भुसावळ) , उत्तेजनार्थ- उपासना कुंदन कोळी (सेंट अलाईसेस स्कूल भुसावळ)

द्वितीय गट ( इयत्ता ३ री, ४ थी )
प्रथम- राहुल प्रमोद वंजारी (इंदिराबाई ललवाणी प्राथमिक विद्यामंदिर, जामनेर), द्वितीय- कार्तिकी निलेश पाटील (ओरियन सीबीएसई स्कूल, जळगाव), तृतीय – मानवी विनोद पाटील (वडगाव), उत्तेजनार्थ अनुश्री अनिल चौधरी (प वि पाटील विद्यालय, जळगाव)

तृतीय गट ( इयत्ता ५ वी ते ७ वी )
प्रथम – काव्या आनंद फेगडे (ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव), द्वितीय – ओजस्विनी ज्ञानेश्वर मोरे (बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, शेलवड) तृतीय – कोहिनूर हेमंतकुमार मोरे (इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर) उत्तेजनार्थ- तेजस्वी संदीप वरुळकर (इनफिनिटी पॉवर लर्न स्कूल ), विधी गजानन किनगे (काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव)

चतुर्थ गट ( इयत्ता ८ वी ते १० वी )
प्रथम- धनश्री नंदकिशोर नेतकर (बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, शेलवड), द्वितीय- हंसिका नरेंद्र महाले (सेंट अलाईसेस हायस्कूल भुसावळ), तृतीय- वैष्णवी अतुल पवार (एन पी पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे) उत्तेजनार्थ- अथर्व दीपक चव्हाण (डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ)

पाचवा गट (खुला गट )
प्रथम- श्रीकांत गुरु रंगुबाई लासुरकर (दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव), द्वितीय- चेतना रणदीप हिरे (एस एस एम एम कॉलेज, पाचोरा), तृतीय- तीर्थराज तुकाराम इंगळे (एन पी पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे), उत्तेजनार्थ- देवेंद्र रवींद्र सुरळकर, (जामनेर)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!