रावेर येथे म.रा.पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न.. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा नियुक्ती पत्र देऊन सत्कार
खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राचेर तालुका ची बैठक दि.१६ मार्च रविवार रोजी रावेर रेस्ट हाऊस येथे उत्तर महारात्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई) व तालुकाध्यक्ष विजय अवसरमल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी परिसरातील पत्रकार बंधु मोठ्धा संख्येने उपस्थित होते.

पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या म.राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वासाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असे यावेळी ठरवण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अनिल आसेकर, शे.मुनाफ शेख, विनायक जहुरे, चंद्रकांत वैदकर, कांतीलाल गाढे, सादिक पिंजारी, दिनेश सैमिरे, प्रशांत गाढे, उमेश तायडे, सुनील महाजन, शेख हमीद, ईश्वर महाजन, शे.शरीफ, विजय के.अवसरमल, जितू इंगळे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.सदर प्रास्ताविक विनायक जहुरे यानी तर आभाप्रदर्शन कांतीलाल गाढे मानले.