भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलमहाराष्ट्र

पारा घसरला, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील ‘या ‘  जिल्ह्यात थंडीची लाट

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यभरात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर महाराष्ट्रात हिवाळा सुरू झाल्यापासूनच थंडीचा मोठा कडाका पाहायला मिळत आहे.होता. आज नाशिकमध्ये आकाश निरभ्र असेल. इथलं कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने
राज्यात शित लहरींचा इशारा दिला आहे.

धुळे, जळगाव, निफाड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, गोंदिया,वर्धा अशा काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा १० अंशांपेक्षा कमी नोंदवला गेला.

२४ तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. ज्यामुळं राज्यात ही थंडीची लाट मुक्काम वाढवताना दिसेल. सध्याच्या घडीला निफाडमध्ये पारा ६ ते ७ अंशांदरम्यान असतानाच सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली आहे. इथं तापमान ४.१ अंशांवर असून, ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. मुंबईतील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे राहील. पुणे शहरामध्ये ढगाळ आकाशासह काहीसं धुकं असेल. पुण्यातील कमाल तापमान २८ अंश तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस एवढं राहील. छत्रपती संभाजीनगर मध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील. कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस एवढं राहील. उत्तर महाराष्ट्रातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक मध्ये निरभ्र आकाश राहील राहणार असून किमान तापमान १२ अंशांवर राहील.

थंडीची लाट
राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. तर २० डिसेंबर नंतर पुढील काही दिवस राज्यात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे.

दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्येही थंडी हुडहुडी भरायला लावत आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानाशी जुळवून घेत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!