पारा घसरला ; उत्तर महाराष्ट्रासह राज्यात थंडीचा जोर वाढणार, काय आहे IMD चा अंदाज
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून राज्यातील विविध भागांत थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. सर्वच भागांतील किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्यात यंदा आता गारठा जाणवू लागलाय. उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही गारठा वाढू लागला असून भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार असून उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात यंदा कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही गारठा वाढत आहे. येत्या तीन ते चार दिवसात तापमानात घट होणार असून नोव्हेंबरच्या शेवटी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात किमान तापमान १०° पेक्षा ही खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.