“त्या” कवटी आणि हाडांचे अवशेष आढळलेल्या खुनाचा अखेर उलगडा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात झालेल्या दोन खुनाचा उलगडा अखेर पोलिसाने केला असून ही दोन्ही खून एकाच व्यक्तीने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारात कवटी आणि हाडांचे अवशेष आढळलेल्या खुनाचा व पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथील महिलेचा या दोन घडलेल्या निघृण खुनांचा उलगडा झाला आहे. या दोन्ही खुनांचा सूत्रधार अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. जी अमळनेर) हाच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
सुरत येथील वैजयंताबाई भोई व पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील रहिवासी शोभाबाई कोळी या दोन्हींच्या खुनांची कबुली अनिल संदनशिव याने अमळनेर पोलिसांकडे दिली आहे.
२३ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील सुमठाणे पासून ८०० मीटर अंतरावर असलेल्या जानवे (ता. अमळनेर) परिसरात पोलिसांना एका महिलेचे आधार कार्ड, चप्पल, इतर साहित्य, कवटी आणि हाडांचे अवशेष आढळून आले होते.
त्या आधी जून रोजी सुमठाणे (ता. पारोळा) शिवारात शोभाबाई रघुनाथ कोळी (४८, रा. उंदिरखेडा, ता. पारोळा) या घरकाम करणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. शोभाबाई कोळी हिच्या खुना नंतर महिनाभराने वैजंताबाई भोई या महिलेचा खून झाला, या दुहेरी हत्याकांडा मुळे जळगाव जिल्हा हादरला.
अमळनेर पोलिसांनी दोन्ही खुनांमधील साम्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. या महिलेचे नाव वैजयंताबाई भगवान भोई (५०, रा. सूरत) असे असल्याचे समोर आले. वैजयंताबाई भोई या फरकांडे ता. एरंडोल येथील मूळ रहिवासी आहेत. दिनांक २ मे रोजी त्या सुरतहून आपल्या गावी आल्या होत्या. वैजयंताबाई व अनिल यांची सूरत येथूनच ओळख झाली. त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार सुरत पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती
वैजयंताबाईचा खून ५ जुलै रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता. अनिल संदानशिव आणि त्यांची सुरतला ओळख होती. ते दोघे एकत्र अमळनेरकडे परतले होते. त्यानंतर अनिलने वैजयंताबाईला जानवे जंगलात नेऊन तिचा निघृण खून केल्याची कबुली दिली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
